HC on Sameer Wankhede-SRK Leaked Whatsapp Chat: मुंबई उच्च न्यायालयाचे समीर वानखेडे यांना अंतरिम संरक्षणात वाढ, शाहरुखसोबतचे चॅट लिक प्रकरणी सुनावले खडेबोल

कोणत्याही प्रकारचे साहित्य व्हॉटसअपद्वारे शेअर न करण्याचे आणि कोणतेही प्रेस स्टेटमेंट न देण्याची निर्देश देण्यात आले आहेत.

Sameer Wankhede (PC - ANI)

प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना अंतरिम सरक्षण दिले आहे, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचे साहित्य व्हॉटसअपद्वारे शेअर न करण्याचे आणि कोणतेही प्रेस स्टेटमेंट न देण्याची निर्देश देण्यात आले आहेत. तपासात हजर राहण्याचे आश्वासन यावेळी वानखेडे यांनी दिले आहे. दरम्यान शाहरुख खान सोबतचे चॅट लिक केल्याप्रकरणी न्यायालयाने वानखेडेंना खडे बोल ही सुनावले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now