Jalgaon Chemical Factory Blast: जळगावमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी

जळगावमध्ये केमिकल कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याचे समजत आहे.

Jalgaon Chemical Factory Blast: जळगावमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; एका कामगाराचा मृत्यू, 17 जखमी
Blast| Image Used For representational Purpose | Pixabay.com

Jalgaon Chemical Factory Blast : जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. केमिकल कंपनीत मोठा स्फोट(Blast) झाला आहे. स्फोटानंतर संपूर्ण कंपनीला आग लागली आहे. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, 17 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कारखान्यात अनेक जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.आग विझवण्यासाठी आग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्या आहेत. जवळपास ३० अग्निशामक गाड्या तेथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. (हेही वाचा :Navi Mumbai Fire: नवी मुंबईत नवभारत इंडस्ट्रियल कंपनीला आग, अग्निशमक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2024 03:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).