Rohit Pawar On BJP: जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय; रोहित पवार यांची भाजपवर टीका

राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि युवकांमध्ये मोठा असंतोष असल्याने या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने वक्फ बोर्डाच्या निधीचा मुद्दा पुढे आणला आहे. वक्फ बोर्डाला दिला गेलेला निधी नियमित निधी असून वेगळा निधी दिला गेला असा विषय नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

Rohit Pawar On BJP: तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना 2011 पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते, आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, 'त्रयस्थ संस्था किंवा व्यक्ती ज्यांना काडीची अक्कल नसते, अशांच्या मदतीने काहीतरी वेगळेच मुद्दे उकरुन काढत जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय आहे. राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि युवकांमध्ये मोठा असंतोष असल्याने या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने वक्फ बोर्डाच्या निधीचा मुद्दा पुढे आणला आहे. वक्फ बोर्डाला दिला गेलेला निधी नियमित निधी असून वेगळा निधी दिला गेला असा विषय नाही. त्यामुळे भाजपच्या अजेंड्याला बळी न पळता बोगस बियाणे, शेतकरी कर्जमाफी आणि बेरोजगारी, पदभरती या विषयांवर मीडियाने भर द्यायला हवा.

रोहित पवार ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement