अमित शाह यांच्या पाठोपाठ आज दिल्लीवरून BJP अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई मध्ये सार्वजनिक गणेशोत्सामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. आज मुंबई मध्ये येताच त्यांनी 'लालबागच्या राजाचं' दर्शन घेतलं आहे. त्यानंतर ते मुंबई, पुण्यात बाप्पांचं दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. गिरगावातही केशवजी नाईक चाळीच्या गणपतीला ते भेट देणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे आदि नेते उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. @JPNadda जी यांनी ' लालबागचा राजा ' चे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis प्रदेशाध्यक्ष मा. @cbawankule जी आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव मा. @TawdeVinod जी उपस्थित होते. pic.twitter.com/2qbZXwDd2A
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 26, 2023
#WATCH | BJP chief JP Nadda, Maharashtra Dy CM Devendra Fadnavis, Mumbai BJP President Ashish Shelar offer prayers at Mumbai's Lalbaugcha Raja during Ganesh Chaturthi festivities pic.twitter.com/UY8a4Im0KV
— ANI (@ANI) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)