NEET Paper Leak Case: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नीट घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास आता CBI करणार
NEET Paper Leak Case: राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) नीट-2024 परीक्षेतील गोंधळाप्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपांनुसार, NTA मध्ये 4 हजार 750 केंद्र आणि 14 शहरांमधील नीट-यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. नीट-यूजी परीक्षेत 23 लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील काही परीक्षा केंद्रांवर गोंधळाचा प्रकार समोर आला. या प्रकरणी शिक्षण मंत्रालयाने नीट-यूजी परीक्षेत कथित गोंधळाची चौकशी सीबीआयकडे सोपवली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)