Sharad Mohol Murder Case: कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात मोठी कारवाई; 11 जणांवर अटक
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या संशयितांचा कसून शोध घेत आहेत.
Sharad Mohol Murder Case: रविवारी रात्री पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाच्या (Sharad Mohol Murder) संदर्भात महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलारसह 11 जणांना या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या संशयितांचा कसून शोध घेत आहेत. अखेर पनवेल पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी दरम्यान पकडण्यात यश मिळविले. (हेही वाचा - New Mumbai: प्रेमप्रकरणातून तरुणीचा उड्डाणपुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; पहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)