Bharat Ratna: 'बाळासाहेब ठाकरेंनाही मिळायला हवा भारतरत्न'; Raj Thackeray यांची केंद्र सरकारकडे मागणी

याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

Raj Thackeray Demands Bharat Ratna for Bal Thackeray

Raj Thackeray Demands Bharat Ratna for Bal Thackeray: केंद्र सरकारने माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली आहे. राज ठाकरे लिहितात, ‘माजी पंतप्रधान स्व. पी.व्ही. नरसिंहराव, स्व. चौधरी चरण सिंग आणि भारतीय हरित क्रांतीचे जनक एस.स्वामिनाथन ह्यांना भारतरत्न सन्मान घोषित करण्यात आला. ह्या यादीतले एस.स्वामिनाथन ह्यांचं अवघ्या काही महिन्यांपूर्वी निधन झालं. इतकी अफाट कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञाला त्यांच्या हयातीत हा बहुमान मिळायला हवा होता. असो. बाकी पी.व्ही नरसिंहराव आणि चौधरी चरण सिंग ह्यांना आणि काही वर्षांपूर्वी प्रणब मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून, केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारने राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग हेच औदार्य त्यांनी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांना देखील भारतरत्न घोषित करून दाखवायलाच हवं.’

ते पुढे म्हणतात, ‘देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा. स्व. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल.’ (हेही वाचा: Hussain Dalwai On PV Narasimha Rao: नरसिंह राव यांनी 'त्यांना' मशीद पाडण्यात मदत केली होती- हुसेन दलवाई)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif