BEST Complet 150 Years: बेस्टला 150 वर्षे पूर्ण! मुंबईकरांना प्रदर्शनातून अनुभवता येणार आजपर्यंतचा ट्राम युगचा इतिहास (Watch Video)

बेस्टचा इतिहास तसा खूप रोमांचर आहे. बेस्टचा हाच प्रवास सर्वसमान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बेस्टकडून खास प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

BEST Double-Deckers (Photo Credits-Twitter)

BEST Complet 150 Years: बेस्ट परिवहन सेवेला तब्बल 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 9 मे 1874 रोजी मुंबईच्या रस्त्यांवर पहिली बस धावली होती. एवढा मोठा टप्पा गाठताना बेस्टला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, हा आनंद साजरा करण्यासाठी बेस्टने खास तयारी केली आहे. 150 वर्षपूर्ती आठवणीत रहावी त्यासाठी बेस्टने खास प्रदर्शनाचे(Exhibition) आयोजन केले आहे. ज्यात बेस्ट ट्राम युग(Tram Era)चं दर्शन मुंबईकांना अनुभवता येणार आहे. बेस्टने त्यांच्या एक्स अकाऊंटवरून त्याबाबतची घोषणा केली आहे. बेस्ट म्युझियम, अनिक डेपो येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. 9 मे पासून 11 मे पर्यंत सकाळी 10.00 ते 17.00 या वेळेत हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement