Bengaluru Rape Case: पार्टीवरून उशीरा घरी परतणाऱ्या तरुणीवर बलात्कार; लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वारानेच केले दुष्कृत्य
बंगळूरुमध्ये महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षात असणाऱ्या एका विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थीनी पार्टीवरून घरी परतत असताना तिच्यासोबत ही घटना घडली.
Bengaluru Rape Case:एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्याबाबतची माहिती इंडिया टुडेला दिली. रविवारी पहाटेच्या वेळी ही घटना घडली. तरूणी कोरमंगला येथून हेब्बागोडी येथे घरी परतत होती. ज्या व्यक्तीकडून तिने लिफ्ट घेतली होती. त्याने तिच्यावर हल्ला केला यात ती जखमी झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Woman Doctor Assaulted at Sion Hospital: मुंबई च्या सायन हॉस्पिटल मध्ये मद्यधुंद अवस्थेतील रूग्ण आणि साथीदारांकडून महिला निवासी डॉक्टर वर हल्ला)
पोस्ट पहा:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)