Barsu Refinery Protest: बारसू आंदोलनातील 8 गावकऱ्यांवरील 144(2) आदेश मागे घेण्यावर राज्य सरकार सशर्थ सहमत

मात्र, ही सहमती सशर्थ असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, आदेश मागे घेण्यात आलेल्या त्या 8 गावकऱ्यांना 1 महिन्यासाठी राजापूर (घरी) प्रवेश करण्यास आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Ratnagiri Barsu Refinery Protest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडचा अब्जावदी डॉलर्स गुंतवुकीचा प्रकल्प कोकणात येतो आहे. हा प्रकल्प रत्नागिरी येथील बारसू या ठिकाणी प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा प्रचंड विरोध आहे. मात्र, या विरोधाला न जुमानता प्रकल्प राबविण्यावर राज्य सरकार ठाम आहे. दरम्यान, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांपैकी 8 गावकऱ्यांवरील 144(2) आदेश मागे घेण्यास राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे. मात्र, ही सहमती सशर्थ असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, आदेश मागे घेण्यात आलेल्या त्या 8 गावकऱ्यांना 1 महिन्यासाठी राजापूर (घरी) प्रवेश करण्यास आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे. (हेही वाचा, Ratnagiri Barsu Refinery Protest: रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनातून 25 महिलांना अटक, अजित पवार, संजय राऊत यांचा राज्य सरकारला इशारा)