Balasaheb Chandore Join Shinde Group: उद्धव ठाकरेंना झटका; बाळासाहेब चांदोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार शिंदे गटात प्रवेश

पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदोरे (Balasaheb Chandore) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत

CM Eknath Shinde | Twitter/CMO

Balasaheb Chandore Join Shinde Group: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चांदोरे (Balasaheb Chandore) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक नेते आज संध्याकाळी शिंदे कॅम्पमध्ये सामील होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 हून अधिक आमदारांच्या गटाने गेल्या वर्षी जूनमध्ये महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. 17 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे कॅम्पचे अधिकृत नाव आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह कायम ठेवण्याचे आदेश दिले. (हेही वाचा - Maharashtra Politics: शरद पवारांचा प्लॅन तयार, संजय राऊतांमुळे शिंदे गेले, आता अजित पवार जातील', भाजप खासदारांचा अजब दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now