32 वर्षांपूर्वी कारसेवक म्हणून आणलेली बाबरीची वीट Bala Nandgaonkar यांनी आज राज ठाकरेंना दिली भेट; 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या आठवणीत झाले भावूक
मी राम मंदिराच्या सध्याच्या जागेची एक वीट स्मरणिका म्हणून घरी परत आणू इच्छितो असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
पूर्वीचे शिवसैनिक आणि आताचे राज ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून मनसे साठी काम करणार्या बाळा नांदगावकर यांनी आज 32 वर्षांपूर्वी ते कारसेवक म्हणून बाबरी तोडायला गेले असता तेव्हाची वीट आज राज ठाकरे यांना भेट दिली आहे. या वेळी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या आठवणीमध्ये ते भावूक झाल्याचं दिसलं. राम मंदिर उभं राहिल्यानंतर बाळासाहेबांना आपल्याला ही वीट द्यायची होती. आज ते नाहीत पण आम्ही आता राज ठाकरेंना त्यांच्या रूपात पाहतो आणि ति वीट आज राज ठाकरेंना भेट देत असल्याचं ते म्हणाले आहे. यावेळी त्यांनी मीडीयाशी बोलताना कारसेवक म्हणून अयोध्येच्या आठवणींना उजाळा दिला. Raj Thackeray On Ram Mandir: आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, 32 वर्षांनी शरयू नदी हसली; राज ठाकरेंनी पोस्ट शेअर करत व्यक्त केली भावना .
पहा पोस्ट