Baba Siddique will join NCP: बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, तारिखही ठरली
11 फेब्रुवारीला इतरही आणखी काहीजण पक्षात प्रवेश करतील," असे ते म्हणाले.
काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "बाबा सिद्दिकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. 11 फेब्रुवारीला इतरही आणखी काहीजण पक्षात प्रवेश करतील," असे ते म्हणाले. (हेही वाचा, Baba Siddique to Join NCP: कॉंग्रेसची 48 वर्षांची साथ सोडणं वेदनादायी, पण काही गोष्टींवर न बोलणंचं योग्य; 'वरिष्ठां'बाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत बाबा सिद्दीकी यांनी जाहीर केला एनसीपी पक्ष प्रवेशाचा निर्णय)
एक्स पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)