Baba Siddique will join NCP: बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, तारिखही ठरली

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "बाबा सिद्दिकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. 11 फेब्रुवारीला इतरही आणखी काहीजण पक्षात प्रवेश करतील," असे ते म्हणाले.

Baba Siddique will join NCP:  बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, तारिखही ठरली
Ajit Pawar | (Photo Credit: ANI)

काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "बाबा सिद्दिकी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. 11 फेब्रुवारीला इतरही आणखी काहीजण पक्षात प्रवेश करतील," असे ते म्हणाले. (हेही वाचा, Baba Siddique to Join NCP: कॉंग्रेसची 48 वर्षांची साथ सोडणं वेदनादायी, पण काही गोष्टींवर न बोलणंचं योग्य; 'वरिष्ठां'बाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत बाबा सिद्दीकी यांनी जाहीर केला एनसीपी पक्ष प्रवेशाचा निर्णय)

एक्स पोस्ट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 09, 2024 10:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).