Baba Siddique Namaz-E-Janaza: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन, आज होणार नमाज-ए-जनाजा
बांद्रा येथील मकबा हाइट्स येथे आज संध्याकाळी 7 वाजता नमाज-ए-जनाजा होणार असून बडा कबरस्तान येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई येथील नेते बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज (13 ऑक्टोबर) मगरीबच्या नमाजानंतर सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे चिरंजीव आणि आमदार झीशान सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार,सायंकाळी 7 वाजता सिद्दीकी यांची नमाज-ए-जनाजा (अंत्ययात्रा) 15 ए, पाली रोड, पाली नाका, वांद्रे (West) येथील मकबा हाइट्स येथे पार पडेल. नमाजानंतर रात्री 8:30 वाजता मरीन लाइन्स स्टेशनच्या समोर बडा कबरस्तान येथे दफन केले जाईल.
झीशान सिद्दीकी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुंबई-आमदार झीशान बाबा सिद्दीकी आणि डॉ. अर्शिया सिद्दीकी यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन झाले आहे. ते त्यांच्या मागे पत्नी श्रीमती शहझिन सिद्दीकी आणि सार्वजनिक सेवेचा वारसा सोडून गेले आहेत.
झीशान सिद्दीकी यांनी वडिलांच्या नमाज-ए-जनाजा बद्दल दिली माहिती
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)