Aurangabad Hospital Deaths: महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव सुरूच; नांदेडनंतर आता औरंगाबादमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या 8 जणांमध्ये 2 नवजात बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये मृत्यूची मालिका सुरूच आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 36 तासांत 31 मृत्यूंनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) घाटी रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या 8 जणांमध्ये 2 नवजात बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रकरणी शोक व्यक्त केला आहे.
याआधी नांदेड येथे सोमवारी रात्री 24 तासांत 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. यानंतर, रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तज्ञांचे एक पथक पाठविण्यात आले. मात्र, दरम्यान, पुढील 12 तासांत 4 मुलांसह आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा: Raj Thackeray On Nanded Hospital Tragedy: तीन इंजिन बसवूनही महाराष्ट्राची तब्येत व्हेंटिलेटरवर; नांदेड शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज ठाकरेंचे सरकारवर टीका)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)