Attempt to Burn EVM Machine in Solapur: सोलापूर मतदारसंघात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न (Watch Video)

Solapur EVM | Twitter

सोलापूर मध्ये लोकसभेसाठी मतदान सुरू असताना एकाने चक्क ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ही घटना घडली आहे. पेट्रोल टाकून ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर काही काळ मतदानाची प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान या प्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. Solapur Lok Sabha Election 2024: सोलापूरमध्ये मतदानाला सुरुवात होताच EVM मशीनमध्ये बिघाड; मतदारांमध्ये नाराजी .

सोलापूरात ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)