Surekha Yadav Drives Vande Bharat: आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्या हातात आज सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस  चं सारथ्य (See Photos)

साताऱ्याच्या पायलट सुरेखा यादव यांनी आज सोलापूर ते सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस चालवत नवा इतिहास रचला आहे.

Surekha Yadav | Twitter

सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा आज मान आशियातल्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांना मिळाला आहे. यामुळे त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीएसएमटी-सोलापूर-सीएसएमटी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवत नवी ट्रेन सेवा मुंबईकरांना देण्यात आली होती. आता या ट्रेनचं सारथ्य एका महिलेकडे आलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now