Ashok Chavan on INDIA Alliance: 'इंडिया युती काम करत नाही, लोकांना या ठिकाणी त्यांचे भविष्य दिसत नाही'- भाजप नेते अशोक चव्हाण (Video)
राज्यसभा सदस्य झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची अधिक व्यापक संधी आहे.
Ashok Chavan on INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सातत्याने राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवणार आहे. पक्षांतराबाबत अशोक चव्हाण म्हणतात, ‘मला आशा आहे की गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडतील. राज्यसभा सदस्य झाल्यामुळे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची अधिक व्यापक संधी आहे. मला वाटले की इथे (भाजपमध्ये) चांगल्या संधी आहेत. राष्ट्रीय परिस्थिती असो किंवा राज्य, भाजपचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसमध्ये कोणतीही तयारी नाही. त्यामुळे मला वाटते की विजयी पर्याय हा भाजप आहे.’
ते पुढे म्हणतात, ‘इंडिया अलायन्स काम करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. इंडिया अलायन्सचे परिणाम दिसून येत नाहीत. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे लोक एक एक करून युतीमधून बाहेर पडत आहेत. त्यांना या ठिकाणी त्यांचे भविष्य दिसत नाही.’ (हेही वाचा: NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)