Ashok Chavan on Congress: मनात काँग्रेस भाजपात प्रवेश ; अशोक चव्हाण यांचा पक्षांतर कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan BJP) केला असला तरी अशोक चव्हाण यांच्या मनात आणि वर्तनात काँग्रेस विचारच आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला कारण ठरला आहे भाजप मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशावेळचा एक व्हिडिओ.

Ashok Chavan | (Photo Credits: X)

भारतीय जनता पक्षात प्रवेश (Ashok Chavan BJP) केला असला तरी अशोक चव्हाण यांच्या मनात आणि वर्तनात काँग्रेस विचारच आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. या चर्चेला कारण ठरला आहे भाजप मुख्यालयात त्यांच्या पक्षप्रवेशावेळचा एक व्हिडिओ. त्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान पत्रकार परिषद सुरु होते. ज्या पत्रकार परिषदेला भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना अशोक चव्हाण यांच्याकडून बोलताना अनावधानाने काँग्रेसचा उल्लेख झाला आणि सगळेच खळखळून हसू लागले. काय घडलं नेमकं? पाहा व्हिडिओ

अशोक चव्हाण यांना संबोधीत करताना मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष असे म्हणायचे होते. पण, अनावधानाने ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असेच म्हणाले. त्यानंतर पाठिमागील पन्नास वर्षांची सवय आहे. त्यामुळे असे होते, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी समयसूचकता दाखवत वेळ मारुन नेली. उपस्थित भाजपच्या मंडळींनीही त्याला हसून दाद दिली. पण, राजकीय वर्तुळात मात्र भाजप प्रवेश मनात काँग्रेस अशीच चव्हाणांची अवस्था असल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Ashok Chavan Join BJP: अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश; राज्यातील बडे नेते उपस्थीत, समर्थकांची मोठी गर्दी)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now