Ashadhi Ekadashi 2024 Wishes: 'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर' - राज ठाकरे यांची आषाढी एकादशीला विठ्ठल चरणी प्रार्थना

'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.' अशी प्रार्थना आज एकादशी निमित्त राज ठाकरे यांनी केली आहे.

Raj Thackeray | (Photo Credit : File Image)

आज आषाढी एकादशीचा दिवस आहे. विठू भक्त आज राज्याचं आराध्यदैवत विठ्ठल रूक्मिणीचं दर्शन घेत एकादशीचं व्रत पाळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज एकादशीचं औचित्य साधत विठ्ठल माऊलीच्या चरणी 'महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.' अशी प्रार्थना करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  Ashadhi Ekadashi 2024: 'बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे...' मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे .

पहा राज ठाकरे यांची पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now