Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर CM Eknath Shinde पंढरपुरात; घेतले विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, सोयी सुविधांचा आढावा

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला काही महत्वपूर्ण सूचना आणि निर्देश दिले.

CM Eknath Shinde

आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे जाऊन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रत्यक्ष मंदिराला भेट देऊन विठुरायाचे आणि रुक्मिणी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरात आणि सभा मंडपात भाविकांसाठी करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी करून काही सूचना दिल्या. आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाला काही महत्वपूर्ण सूचना आणि निर्देश दिले. यानंतर आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूरातील 65 एकर परिसरात मोठ्या प्रमाणात दिंडी सोहळे उतरतात. या परिसराची पाहणी करून वारकऱ्यांची सोय कशाप्रकारे करण्यात आली आहे याचा आढावा घेत संबंधित निर्देश दिले. (हेही वाचा: आता बालाजीच्या दर्शनाला तिरुपतीला जाण्याची गरज नाही; प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये TTD उभारणार व्यंकटेश मंदिर)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)