Chatrapati Sambhaji Nagar: रस्त्यावरून जाताना दुचाकीने कट मारल्यावरून वाद, दोन गटात मारामारी, 4 जण जखमी (Watch Video)

छत्रपती संभाजी नगरमध्ये दुचाकीने कट मारल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले

sambhajinagar-incident PC TWITTER

Chatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजी नगरमध्ये दुचाकीने कट मारल्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सात्री ११.३० वाजता अंगूरीबाग संकुल परिसरात ही घटना घडली. दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या घटनेत दुचाकीवरील 4 जण जखमी झाले असून या लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी इतरांवरही हल्ला केला आहे. (हेही वाचा- पिकअपच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, क्लिनरला घेतले ताब्यात, डोंबिवली येथील घटना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement