Anil Deshmukh Attacked in Katol: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; कारवर दगडफेक, डोक्याला झाली गंभीर दुखापत (Video)

अनिल देशमुख नरखेड येथील सभा आटोपून तीनखेडा बिष्णूर रस्त्यावरून काटोलकडे परतत असताना, काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाटाजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून हल्ला केला.

Anil Deshmukh Attacked in Katol: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; कारवर दगडफेक, डोक्याला झाली गंभीर दुखापत (Video)
Anil Deshmukh Attacked in Katol

Anil Deshmukh Attacked in Katol: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर नागपूरजवळ काटोलमध्ये हल्ला झाला आहे. त्यांच्या गाडीवर अनेकांनी दगडफेक केली, ज्यात अनिल देशमुख जखमी झाले आहेत. अनिल देशमुख यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. हल्ल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनिल देशमुख गाडीत चालकाच्या शेजारी बसलेल्या सीटवर बसलेले असून त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे चित्रात स्पष्ट दिसत आहे. अनिल देशमुख नरखेड येथील सभा आटोपून तीनखेडा बिष्णूर रस्त्यावरून काटोलकडे परतत असताना, काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाटाजवळ काही लोकांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करून हल्ला केला. त्यांना काटोल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख हे काटोलमधून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत असून सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी अनिल देशमुख नरखेडला गेले होते. (हेही वाचा: Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई; लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ Anmol Bishnoi ला अमेरिकेत अटक)

Anil Deshmukh Attacked in Katol: 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2024 09:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).