Mumbai Goa Highway Accident: ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचं निधन, खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला शोक

खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दीपेश मोरे यांच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Deepesh More

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात निधन झाले. एक सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून दीपेश मोरे कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसवर त्यांची गाडी मागून धडकली. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या तीन सहकारी महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दीपेश मोरे यांच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now