Amravati News: विवाहीत प्रेयसीचे अपहरण, अत्याचार करुन व्हिडिओही बनवला; अमरावती येथील प्रकार
यातील एक आरोपी पीडितेचा प्रियकर (Boyfriend) असल्याचे समजते. तर दुसऱ्या दोन आरोपींनी मुख्य आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. पीडिता विवाहीत असून ती पूर्वी मुख्य आरोपीची विवाहीता असल्याचा दावा करण्यात येतो आहे.
अमरावती (Amravati News) जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या महिलेवरील अत्याचार प्रकरणात तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी पीडितेचा प्रियकर (Boyfriend) असल्याचे समजते. तर दुसऱ्या दोन आरोपींनी मुख्य आरोपीला मदत केल्याचा आरोप आहे. पीडिता विवाहीत असून ती पूर्वी मुख्य आरोपीची विवाहीता असल्याचा दावा करण्यात येतो आहे. दरम्यान, विवाहीत प्रेयसीचे (Marriadge Girlfriend) अपहरण (Kidnapping) करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे शिवाय या अत्याचाराचा व्हिडिओही चित्रीत करण्यात आल्याचा आरोप पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.
मयूर रामदास मंदूरकर (वय 23), सतीश (वय 25) आणि रिकेश (वय 24) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही पुसद येथील राहणारे आहेत. प्राप्त माहितीनुसार मयूर आणि पीडिता (वय वर्षे 24) यांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. त्यांचा अधूनमधून संपर्कही होता. दरम्यान, मयूर याने पाच मे रोजी तिला भेटण्यास बोलावले. तेथून त्याने तिचे अपहरण केले आणि चारचाकी वाहनातून तिला मित्राच्या घरी नेले. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला. मित्राचे घर आणि चारचाकी वाहनात तिच्यावर आरोपीकडून अत्याचार करण्यात आला. (हेही वाचा, )
आरोप आहे की, मयूर याच्याकडून अत्याचार सुरु असताना रिकेश याने तिचे हात पकडले. तर सतीश याने अत्याचार सुरु असतानाचे व्हिडिओ चित्रिकरण केले. इतकेच नव्हे तर तोंड उघडले तर जिवे मारले जाईल, अशी धमकीही दिली. आरोपींनी पीडितेला मित्राच्या पोल्ट्री फॉर्मवर नेले. तिथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आला. तिने विरोध करताच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडितेला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली.
एका बाजूला विवाहीतेवर प्रियकराकडून अत्याचार सुरु होते. दुसऱ्या बाजूला पीडितेच्या पतीने पत्नी हरवल्याची तक्रार वलगाव पोलिसांत नोंदवली. पोलिसांनी तक्रारीवरुन शोध घेतला असता पीडितेचा तपास लागला. दरम्यान, पोलिसांनी पिडीता आणि आरोपी यांना पोलीस ठाण्यात आणल. या वेळी पीडितेने आपण आरोपी (मयूर) याच्यासोबत स्वमर्जीनेच गेलो होतो असा जबाब दिला. दरम्यान, पुढे पिढितेनेच मयूर आपल्याला सोडून गेल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या पतीशी संपर्क केला. मात्र, पतीने तिला घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे आता पीडितेचे करायचे काय? असा सवाल पोलिसांसमोर उत्पन्न झाला. सध्या स्थितीत पोलिसांनी पीडितेला स्त्री रुग्णालयातील वनस्टॉप सेंटर येथे दाखल केले. दरम्यान, 17 मे रोजी पीडितेने रुग्णालयातील परिचारीकेसोबत वलगाव पोलीस ठाणे गाठले आणि तिच्यावरील अत्याचाराचा घटनाक्रम कथन केला.