Lok Sabha Election 2024 Results: शिरूर मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हेंचा सलग दुसऱ्यांदा विजय; खास पोस्ट शेअर करत मानले मायबाप जनतेचे आभार!
कोल्हेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की,
Lok Sabha Election 2024 Results: शिरूर मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. कोल्हेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला. या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे की, 'आव्हान सोपं नव्हतं... दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ...हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं... मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली, महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी बळ दिलं आणि शिवजन्मभूमीच्या सर्व निष्ठावान मावळ्यांनी निकराचा लढा दिला. हा विजय मी शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाविकास आघाडीच्या सर्व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना समर्पित करतो !'
आव्हान सोपं नव्हतं...
दिल्लीतून महाराष्ट्रावर झालेला हल्ला अन् त्यांना लाभलेली काही आपल्याच माणसांची साथ... हे सगळं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लालकरणारं होतं.
मात्र... "आलं अंगावर, घेतलं शिंगावर" याप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली,… pic.twitter.com/yc7hVCcDrp
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 07:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

