Amit Thackeray on Toll Naka Vandalization: मनसैनिकांनी समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाका का फोडला? अमित ठाकरे यांनी सांगितला किस्सा (Watch Video)

'राज ठाकरेंमुळे 65 टोकनाके राज्यात बंद पडले आता माझ्यामुळे त्यात अजून एकाची भर पडल्याची' प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली आहे.

Amit Thackeray | Twitter

ह्ब्ज  शनिवारी अहमदनगरमधील कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर नाशिक मध्ये दाखल झालेल्या अमित ठाकरे यांच्या गाडीची रात्री सिन्नर येथील गोंदे टोलनाक्यावर गाडी अडवल्यानंतर मनसे कडून पुन्हा खळ्ळ खट्याक झालं. दरम्यान दुसर्‍या दिवशी अमित ठाकरे यांनी नेमकं काय घडलं याची हकिकत मीडीयासमोर सांगितली. अमित ठाकरे शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन रात्री त्यांच्या खाजगी कामाला बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत पोलिस नव्हते. गाडी गोंदे टोलनाक्यावर पोहचली तेव्हा गाडीवर फास्ट टॅग असूनही ती थांबवली गेली. तिथे काही तांत्रिक गोंधळ होता. अमित ठाकरेंच्या सहकार्‍यांनी त्याबद्दल सांगितलं असता टोलनाक्यावरील कर्मचारी उद्धटपणे बोलू लागले. त्यांच्या मॅनेजरचे वॉकी टॉकी वर ऐकलेलं संभाषण देखील उद्धटपणाचे असल्याचे अमित ठाकरे म्हणाले. पुढे 15 मिनिटांनी गाडी सोडण्यात आली. जेव्हा हा प्रकार नाशिक, सिन्नर मध्ये कळला तो पर्यंत अमित ठाकरे हॉटेलवर पोहचले होते आणि मनसैनिकांनी राडेबाजी करत टोलनाका फोडला होता.  (हेही वाचा, Amit Thackeray: सिन्नरच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी थांबवली, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची केली तोडफोड (Watch Video))

अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement