Amit Thackeray: सिन्नरच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी थांबवली, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची केली तोडफोड (Watch Video)

त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संपुर्ण टोलनाक्यांची तोडफोड केली.

Manase Photo credit twitter

Amit Thackeray: महाराष्ट्रातील सिन्नर येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.  राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सिन्नर (Sinnar) दौऱ्यावर जात होते. यावेळी टोल नाक्यावर त्यांच्या वाहनाचा टोल विचारण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संतप्तले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संपुर्ण टोलनाक्यांची तोडफोड केली. अमित ठाकरे ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान ते नाशिकच्या सिन्नरला पोहोचले होते. त्यावेळी एक कर्मचारी बूथमध्ये उपस्थित होता. ही घटना 22 जुलै रोजी रात्री घडली. तोडफोडीदरम्यान मनसे कार्यकर्ते सतत मनसे की जयकारच्या घोषणा देत होते.  मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही संपूर्ण घटना समृद्धी महामार्गाच्या नाशिक सिन्नर महामार्गादरम्यान बांधलेल्या टोलनाक्याची आहे. सुमारे अर्धा तास अमित ठाकरे यांचा ताफा येथे थांबला होता. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी टोल प्लाझाची तोडफोड केली. तोडफोडीदरम्यान तेथे काम करणारे कर्मचारी फरार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सद्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होतेय. मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)