Ambernath Road Rage: अंबरनाथमध्ये रोड रेजची धक्कादायक घटना; कार चालकाने व्यक्तीला धडक देऊन फरफटत नेले, नंतर एका गाडीला दिली जोरदार टक्कर (Watch Video)

आधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली आणि नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. त्यानंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडकही दिली. नंतर एसयूव्ही ड्रायव्हरने यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली.

Ambernath Road Rage: अंबरनाथमध्ये रोड रेजची धक्कादायक घटना; कार चालकाने व्यक्तीला धडक देऊन फरफटत नेले, नंतर एका गाडीला दिली जोरदार टक्कर (Watch Video)
Ambernath Road Rage (Photo credits: X/@BhuvanKana21653)

Ambernath Road Rage: महाराष्ट्रातील अंबरनाथ येथून रोड रेजची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका माथेफिरू एसयूव्ही चालकाने आपल्या कारने 5 जणांना चिरडले. आधी त्याने एका कारस्वाराला धडक दिली आणि नंतर एका व्यक्तीला गाडीखाली फरफटत नेले. त्यानंतर त्याने या व्यक्तीला जोरदार धडकही दिली. नंतर एसयूव्ही ड्रायव्हरने यू-टर्न घेतला आणि दुसऱ्या एका कारला धडक दिली. त्या कारमध्ये काही मुले आणि एक महिला बसलेली दिसत आहेत. शेवटी, काही लोकांनी एसयूव्ही कारवर दगडफेक केली व त्यानंतर ते पीडितेच्या मदतीसाठी धावले. या घटनेचे दोन व्हिडिओ समोर आले आहेत. कार चालकाच्या या कृत्याने संपूर्ण रस्त्यावर गोंधळ उडाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेचच ठाणे पोलिसांनी या घटनेची माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Viral Video: अटल मार्गावर प्रवाशांसह ऑटो चालकाचा जीवघेणा स्टंट, व्हिडीओ व्हायरल)

अंबरनाथमध्ये रोड रेजची थरारक घटना-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2024 09:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).