Solapur News: जुळ्या बहिणींसोबत विवाह करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांकडे प्राप्त झालेल्या एका तक्रारीवरुन या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 494 (पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे) अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात वरावर अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील आयटी व्यावसायिक असलेल्या जुळ्या बहिणींनी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आयोजित एका समारंभात त्याच पुरुषाशी लग्न केले. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या या वृत्ताची पोलिसांनीही पुष्टी केली आहे. दरम्यान, या विवाहाच्या चर्चेसोबत त्यावर आक्षेपही घेण्यात आले. पोलिसांकडे प्राप्त झालेल्या एका तक्रारीवरुन या प्रकरणात पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 494 (पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे) अन्वये अकलूज पोलीस ठाण्यात वरावर अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तक्रारीनुसार, त्या व्यक्तीने आयटी प्रोफेशनल असलेल्या 36 वर्षीय जुळ्या बहिणींशी लग्न केले असा आरोप आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement