JJ Hospital तील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादांवर तोडगा काढण्यासंदर्भात अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या वादाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात या वादावर तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी केली आहे.
जेजे रुग्णालयातील वरीष्ठ डॉक्टरांचा वाद आणि राजीनामासत्र यांवरुन राज्यभर चर्चा सुरु आहे. राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या वादाची दखल घेऊन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात या वादावर तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी केली आहे. अजितपवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून या पत्राबाबत माहिती दिली आहे.
ट्विटर पोस्टमध्ये अजित पवार यांनी पत्राचा दाखला देत म्हटले आहे की, मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामूहिक राजीनामा, रुग्णालयातील मार्डच्या ७५० निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप, जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर होत असलेला दुष्परिणाम, यासंदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांनी तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी पत्रामार्फत केली आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)