Sharad Pawar Gets Death Threat: धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा, अजित पवारांची राज्य सरकारला मागणी
आदरणीय पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. असे अजित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी (Sharad Pawar Gets Death Threat) देण्यात आल्याचे समजते. यावर अजित पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की "आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार...’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल."
पाहा अजित पवाराचे ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement