Ajit Pawar On Nawab Malik in Mahayuti: महायुतीत नवाब मलिक नको म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर अजित पवार गटाने दिली पहिली प्रतिक्रिया!

सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर मांडताना 'त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही.' असं म्हटलं आहे.

Devendra Fadnavis, Ajit Pawar (PC - Facebook)

महायुतीत नवाब मलिक नको असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारा अजित पवारांना सांगितलं आहे. 'त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही' असे ते म्हणाले आहेत. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय प्रतिक्रियांची चर्चा सुरू झाली आहे. यावर  सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांच्याबाबतची भूमिका ट्विटरवर मांडताना 'त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे' असं म्हटलं  आहे. अजित पवारांनीही तटकरेंचं ट्वीट रिट्वीट केलं आहे. Devendra Fadanvis On Nawab Malik In Mahayuti: 'पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा…' आमदार नवाब मलिक महायुतीमध्ये नको; फडणवीसांचे अजित दादांना जाहीर पत्र .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif