'अजित दादांना भविष्यात नक्कीच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल आणि आम्ही त्या दिशेने काम करू': Praful Patel
याआधी 24 जुलै रोजी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार यांची 10 ऑगस्टला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाईल, असा दावा केला होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवले जाणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अशात, ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकप्रिय आणि दिग्गज नेते आहेत, त्यांना आज नाही तर उद्या मुख्यमंत्री होण्याची संधी नक्कीच मिळेल.’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी सांगितले. पटेल म्हणाले, ‘अनेक वर्षांपासून अजित पवार आमच्या पक्षाचे नेतृत्व करत आहेत. जे काम करतात, त्यांना संधी मिळते. अजितदादांनाही नक्कीच मिळेल.’
याआधी 24 जुलै रोजी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार यांची 10 ऑगस्टला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाईल, असा दावा केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि इतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय 10 ऑगस्टच्या सुमारास येईल, त्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री केले जाईल, असे ते म्हणाले होते. (हेही वाचा: चंद्रकांत पाटील यांची विकेट? Ajit Pawar लवकरच पुण्याचे पालकमंत्री- सूत्र)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)