Breaking News: मुकेश अंबांनीना जीवे मारण्याची धमकीचा ईमेल, पोलिसात अज्ञाताविरुध्दात गुन्हा दाखल
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना २७ ऑक्टोबर रोजी एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
Breaking News: उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीत त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी एका ईमेलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. 20 कोटी रुपये न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी आरोपींनी दिली आहे. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, "तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत." मुकेश अंबानींच्या ईमेलवर आलेला मेल पूर्णपणे इंग्रजीत होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)