Ahmednagar Renamed as Ahilyanagar: अहमदनगरचे नामांतर, आता झाले ‘अहिल्यादेवी होळकर नगर'; CM Eknath Shinde यांची मोठी घोषणा
चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात सीएम शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली.
अहमदनगरचे लवकरच नामांतर अहिल्यानगर म्हणून करणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो, त्यामुळे त्यांचे नाव या शहराला देण्यात येणार आहे. चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात सीएम शिंदे यांनी नामांतराची ही घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचे भाग्य आहे.’ याआधी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमनदगरच्या नामांतरची घोषणा केली आहे. जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. (हेही वाचा: शिवराज्याभिषेक सोहळा उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)