Ahmednagar Renamed as Ahilya Nagar: अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं; शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता

Mantralay | (Photo Credit : Twitter)

Ahmednagar Renamed as Ahilya Nagar: अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्या नगर' (Ahilya Nagar) करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे. नामांतराचा हा राज्यातील तिसरा जिल्हा ठरला आहे. गेल्या वर्षी, औरंगाबाद आणि उस्मानाबाद महसूल विभागांचे अधिकृतपणे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव महसूल विभाग असे नामकरण करण्यात आले होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्या नगर' करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)