सुप्रिया सुळेंबाबत बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची जीभ घसरली; केला गलिच्छ भाषेचा वापर (Watch Video)
अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबात अतिशय हीन दर्जाच्या शब्दांचा वापर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे याआधी अनेकदा आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे चर्चेत आले आहेत. आता अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंवर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. याआधी सुप्रिया सुळेंनी खोके देण्याच्या ऑफरबाबत टीका केली होती, त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सत्तार यांना प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबात अतिशय हीन दर्जाच्या शब्दांचा वापर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुढील 24 तासांत अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना आमच्या भाषेत उत्तर दिले जाईल असे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
First it was go work in the kitchen and elsewhere, & now this statement by a sitting cabinet Minister in Maharashtra tantamounts to giving her money- the conjecture is well established. These are the people who are legislators & claim to be part of a ‘new’ progressive सरकार (2/3)
— sadanandsule (@sadanandsule) November 7, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2022 04:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

