Leopard Spotted in Katraj Ghat: दिवेघाट परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर आता कात्रज घाटात दिसला बिबट्या (Watch Video)

पुण्याजवळील दिवे घाट परिसरात बिबट्या दिसल्यानंतर आता बिबट्या कात्रज घाटात दिसला आहे. कात्रज घाटात बिबट्याचा वावर असल्याचा एक व्हिडिओ सोशल समोर आला आहे.

Leopard Spotted in Katraj Ghat: पुण्याजवळील दिवे घाट परिसरात बिबट्या रस्ता (Leopard) ओलांडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे दिवे घाटा(Dive Ghat)जवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन्य प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येत असल्याची घटना निवळत नाही तोच कात्रज घाटात(Katraj Ghat) बिबट्या असल्याच समोर आलं आहे. सासवडकडून वकडीकडे येताना घाटाच्या उताराजवळ बिबट्या रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला आहे. सुदैवाने, समोर जाणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली नाही. थोडक्यात त्याचा जीव वाचला आहे. बिबट्याचे दर्शन होताच, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान कात्रज घाटात बिबट्या रात्रीच्या अंधारात वावरताना दिसला. त्यामुळे तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असणार हे नक्की. (हेही वाचा: Leopard Video: काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video))

व्हिडीओ पहा-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement