एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कुलाबा मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार (Watch Video)
शपथविधीनंतर कुलाबा मध्ये रिगल सिनेमागृहाबाहेर असलेल्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला आहे.
मुख्यमंत्री पदावरून आता महायुतीच्या नव्या सरकार मध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर उपमुख्यमंत्र्याची जबाबदारी आली आहे. शपथविधीच्या शेवटच्या काही तासांपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर सस्पेंस होता. पण अखेर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या शपथेच्या वेळेस एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचा उल्लेख केला. या शपथविधीनंतर कुलाबा मध्ये रिगल सिनेमागृहाबाहेर असलेल्या पुतळ्याला एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रताप सरनाईक होते. Eknath Shinde Takes Oath as Dy CM: एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा उल्लेख (Watch Video).
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)