रजिस्टर मॅरेज नंतर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा गोव्यात पार पडला 'ख्रिश्चन'पद्धतीने विवाहसोहळा

नताशा पटेल ही मंत्री जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक मुलगी आहे. 7 डिसेंबरला तिचं रजिस्टर पद्धतीने लग्न लावल्यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

नताशा-एलन विवाहसोहळा । PC: Twitter

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला डॉ. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा ने मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने विवाह सोहळा केल्यानंतर आता गोव्यात तिने ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला आहे. एलेन पटेल याच्यासोबत विवाहबंधनात अडकताना दोन्ही कुटुंबीयांची तिथे उपस्थिती होती. जितेंद्र आव्हाडांनी लग्न सोहळ्यातील काही क्षण शेअर केले आहेत. दरम्यान मंत्री आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी देखील नवदांपत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.

नताशा-एलन चा विवाहसोहळा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now