सरकारचा मुंबईवर राग का? कांजुर कारशेडवरुन आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकेची झोड

‘मुंबईवर पहिला वार करून मेट्रोची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत नेण्यात यश मिळवल्यानंतर आता एका मेट्रो मार्गासाठी कांजुरमार्गचीच जागा निवडण्यात आली आहे. या शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का आहे’ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचा समाचार घेतला. ‘राज्य सरकारच्या महसूल विभागाकडून मेट्रो 6 च्या कारशेडसाठी कांजुरमार्गची जागा ‘एमएमआरडीए’कडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. ‘मुंबईवर पहिला वार करून मेट्रोची कारशेड पुन्हा आरे वसाहतीत नेण्यात यश मिळवल्यानंतर आता एका मेट्रो मार्गासाठी कांजुरमार्गचीच जागा निवडण्यात आली आहे. या शिंदे सरकारचा मुंबईवर एवढा राग का आहे’ असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement