Amey Ghole Join Shinde Group: आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अमेय घोलेंनी दिला युवा सेनेच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा; शिंदे गटात होणार सामील

यंदा महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित असल्याने माजी नगरसेवक घोले यांच्या राजीनाम्याला महत्त्व आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, पक्षाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीला घोले गैरहजर होते, त्यामुळे ते युवासेनेचा त्याग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जातील अशी अटकळ बांधली जात होती.

Amey Ghole, Aditya Thackeray (PC- Twitter, PTI)

Amey Ghole Join Shinde Group: उद्धव ठाकरे गटाला आणखी एक फटका बसला आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अमेय घोले यांनी सोमवारी पक्षाच्या कामकाजातील मतभेदांमुळे युवा सेनेच्या कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यंदा महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित असल्याने माजी नगरसेवक घोले यांच्या राजीनाम्याला महत्त्व आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, पक्षाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीला घोले गैरहजर होते, त्यामुळे ते युवासेनेचा त्याग करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जातील अशी अटकळ बांधली जात होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घोले गेल्या काही महिन्यांपासून युथ विंगच्या कारभारावर नाराज होते. घोले यांनी पक्ष संघटनेचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही सोडले होते, त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचा अंदाज येत होता. (हेही वाचा - 'मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही', राष्ट्रवादी नेते Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now