Adarsh School Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार; पोलिसांचा कडक बंदोबस्त

गेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शिंदे याच्यावर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

Photo Credit- X

Adarsh School Badlapur Sexual Assault: बदलापूर आदर्श शाळा बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा कारागृहातून घेऊन जाणाऱ्या वाहनात एन्काउंटर झाल्यानंतर, आता सहा दिवसांनी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सायंकाळी उल्हासनगर येथील स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. यासाठी पोलिसांनी स्मशानभूमीला घेराव घालणे, दरवाजा बंद केला होता. तसेच या अंत्यसंस्काराला विरोध करण्यासाठी शांतीनगर भागातील स्मशानभूमीत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांसह 34 जणांना ताब्यात घेतले. गेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शिंदे याच्यावर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. (हेही वाचा: Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना)

अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement