Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: मंत्री दीपक केसरकर उद्या घेणार बदलापूर येथील पिडीत मुलींच्या पालकांची भेट; दिले दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन

प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: मंत्री दीपक केसरकर उद्या घेणार बदलापूर येथील पिडीत मुलींच्या पालकांची भेट; दिले दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन
Deepak Kesarkar | (Photo Credit - X)

Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर, संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरोपीला कडक शिक्षेची मागणी करत, लोक रस्त्यावर उतरत आहेत. आता या लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात, ‘मी शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका आणि ज्यांनी कारवाई सुरू केली त्या एनजीओ यांच्याशी बोललो. मी घडल्या प्रकरणाबाबत तपशीलवार माहिती गोळा केली. त्यानंतर आरोपीवरील कारवाईबाबत मी आंदोलकांच्या समोर माहिती देणार होतो, मात्र यावेळी आंदोलनस्थळी कोणीतरी बाटली फेकली आणि लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. उद्या मी आंदोलकांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करेन. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यास विलंब केल्याने शाळेच्या मुख्याध्यापिकेलाही आरोपी ठरवण्यात येईल. मुलीचे पालक आज बोलू शकेल नाहीत, त्यांना मी सार्वजनिकरित्या भेटू शकत नाही. जर ते उद्या ठीक असतील तर मी त्यांना उद्या संध्याकाळी भेटण्याचा प्रयत्न करेन,’

बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. (हेही वाचा: Badlapur Adarsh School Sexual Assault Case: 'आरोपीला ताब्यात द्या', मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर बदलापूरकरांचा संताप)

मंत्री दीपक केसरकर उद्या घेणार बदलापूर येथील पिडीत मुलींच्या पालकांची भेट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us