पुणे पोर्श कार अपघातातील आरोपीने Rap Song बनवल्याचा दावा खोटा, व्हिडिओ Cringistaan नावाच्या एका instagram influencer ची असल्याची माहिती

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी दावा केला की, अल्पवयीन आरोपीने रॅप गाणे बनवले आहे. मात्र, ही बातमी खोटी होती.

पुणे पोर्श दुर्घटनेबद्दल एका लहान मुलाचा कथित रॅपिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीची व्हायरल क्लिप आहे. मात्र, हे रॅप गाणे अल्पवयीन आरोपीने गायले नव्हते. युट्यूब आणि इंस्टाग्रामवर ‘क्रिंगिस्टन’ नावाच्या रॅपरने हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी दावा केला की, अल्पवयीन आरोपीने रॅप गाणे बनवले आहे. मात्र, ही बातमी खोटी होती. "एक दिन में मुझे मिल गई बेल, फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल" या गाण्याचे बोल असलेले व्हायरल रॅप गाणे "क्रिगिस्तान" ने बनवले असल्याचे म्हटले जाते.