Journalist Pankaj Khelkar passed away: 'आज तक' वृत्तवाहिनीचे प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आज तक या वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Pankaj Khelkar PC TWITTER

Journalist Pankaj Khelkar passed away: आज तक या वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनीधी पंकज खेळकर यांचे निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी रात्री त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंकज हे अकोला येथील असून ते अनेक वर्षांपासून पुण्यात आज तक या वृत्तवाहिनीशी संबंधित होते. वयाच्या ५२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. हेही वाचा- मंगळुरूमध्ये महिलेची वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण, जमिनीवर ढकलले; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून अटक

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now