Indapur Shocker: हॉटेलमध्ये जेवण करण्यास गेलेल्या तरुणावर इंदापूरमध्ये गोळीबार; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद, पहा व्हिडिओ

ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार (PC - X/@pulse_pune)

Indapur Shocker: इंदापूर (Indapur) शहरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जगदंबा हॉटेलमध्ये (Jagdamba Hotel) जेवण करण्यास गेलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

पहा व्हिडिओ - 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now