मुंबई विमानतळावर फसवणूक होत असल्याचा दावा करणारा 'तो' व्हायरल व्हिडिओ चुकीचा व दिशाभूल करणारा; BMC ने दिले स्पष्टीकरण

विमानतळावर होत असलेल्या चाचण्या व नियमांची अंमलबजावणी ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे

Coronavirus Outbreak | (Photo Credit: PTI)

सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यूकेमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने मुंबई विमानतळावर कोरोना चाचणी आणि विलगीकरण प्रोटोकॉलद्वारे लोकांकडून पैसे उकळण्यासाठी 'फसवणूक' केली जात असल्याचा आरोप केला आहे. मनोज लाडवा नावाची व्यक्ती असून तो आपल्या सासरच्यांच्या अंत्यसंस्कारासाठी 30 डिसेंबरला मुंबईला पोहोचला होता. परंतु येथील विमानतळ चाचणी केंद्रावर त्यांची कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लाडवा यांच्या म्हणण्यानुसार, लंडनमधील हिथ्रो विमानतळावरून उड्डाण घेण्याच्या तीन तास आधी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अशाप्रकारे मुंबई विमानतळावर फसवणूक होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बीएमसीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. विमानतळावर होत असलेल्या चाचण्या व नियमांची अंमलबजावणी ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहे. समाजमाध्यमांवर ‘व्हायरल' होत असलेला 'व्हिडिओ’ चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. अशाप्रकारे या तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)